Sunday 22 January 2012

दै. पुढारी , कोल्हापुर व दै. लोकमत , पुणे च्या ग्रंथ समीक्षकांचे अभिप्राय

विज्ञान आणि अंधश्रद्धा आणि विज्ञान आणि बुद्धिवाद या ग्रंथांविषयी काही वृत्तपत्रांचे ग्रंथ समीक्षक आणि महाराष्ट्रातील इतर काही मान्यवरांचे व्यक्त अभिप्राय


प्राचार्य अद्वयानंद गळतगे

दैनिक पुढारी -

...विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञान आणि बुद्धिवाद हे ग्रंथ मी वाचले आणि थक्क झालो. अनेक अभ्यासपुर्ण संदर्भ आणि वास्तववादी उदाहरणे देऊन लेखकाने दैवी चमत्कार व दैवी अथांगपणा उलगडून दाखवला आहे. ..
आज विज्ञानाच्या नावाखाली ईश्वर आणि त्याची शक्ती बदनाम केली जात आहे. पण ईश्वर शक्ती केवळ श्रद्धेने नव्हे तर प्राचीन ऋषिमुनी यांनी योगसाधना, अंतःस्फूर्ती आणि तपःसाधना यावर आधारित होती हे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. जागोजाग ग्रंथांचे संदर्भ आणि ग्रंथसुची देण्यास ते विसरले नाहीत. त्यामुळे ज्यांना पुरावाच हवा असतो त्यांचे तोंड बंद होईल यात शंका नाही. अभ्यासपुर्ण ओघवती भाषा हे दोन्ही पुस्तकांचे वैशिष्ठ्य आहे. वाचत असताना जणु काही लेखक आपल्याशी बोलतोच आहे, असे वाटत राहाते. एकदा वाचून समाधान होत नाही. काही प्रकरणे पुनः पुन्हा वाचावीशी वाटतात. 

... – दीपक भागवत, कोल्हापुर.

 दै. लोकमत
...या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा...

.......- शंकर सारडा, पुणे.   

No comments:

Post a Comment